kolhapur Megholi lake Bhudargad Taluka | 'पोरं-बाळ लहान हायती'; मंग खायचं काय आता? | Sakal Media<br />कडगाव (कोल्हापूर) : भुदरगड तालुक्यातील मेघोली लघु तलाव फुटला. पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता, की ओढ्याच्या दोन्ही बाजूंची सर्व पिके वाहून गेली. ही घटना रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. मेघोली, नवले, सोनुर्ली, ममदापूर, वेंगरूळ आदी गावांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून तात्काळ याचे पंचनामे पूर्ण करण्यात आले. दरम्यान जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज मेघोली येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून लोकांना दिलासा दिला.<br />#Kolhapur #Bhudargad #megholilake #Maharashtra #megholilakeburst